मुंबई : सरकारने घरगुती विमान प्रवासात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एविएशन मंत्रालयाने घरगुती विमान प्रवासाच्या तिकिटात 15 टक्के वाढ केली आहे. हा निर्णय 1 जूनपासून लागू होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात पसरली आहे. असं असताना विमान मंत्रालयाने विमान प्रवासात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरीक उड्डाण मंत्र्यांनी प्रवासात दरवाढ करण्यास दिली मंजुरी
कोरोनाने पुन्हा डोके वर केले आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत विमान प्रवासावर नियंत्रण आलं आहे. असं असताना नागरीक उड्डाण मंत्रालयाने एअरलाइन्सच्या नेटवर्क कॅपेसिटीतही कपात केली आहे. अशा परिस्थितीत आता 1 जूनपासून दरवाढ होणार आहे.
हा बदल कमीत कमी विमान प्रवासावर केला आहे. डोमेस्टिक विमान प्रवास ‘ए’ ते ‘जी’ पर्यंत अशा सात श्रेणी असतात. या सातही श्रेणीत विमान प्रवास वाढला आहे. मिळालेल्या विमान प्रवासात ‘ए’ श्रेणीत कमीत कमी 2600 रुपये ते सर्वाधिक 7800 रुपये वाढणार आहे.