नागपूर : नवीन शुक्रवारी येथील शिंगाडा मार्केट परिसरातील उद्यानातील मंदिराला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. त्यासंदर्भात नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
उद्यानातील मंदिराला नियमित करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सुनावणी करावी, असा अर्ज ट्रस्टने हायकोर्टात सादर केला होता. त्यावर मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिलाबाई सावरकर यांना समन्स बजावला होता. त्यानुसार सावरकर यांनी न्यायालयात उपस्थित झाल्या. महापालिकेकडून मंदिर पाडण्याच्या कारवाईला ट्रस्टच्या अध्यक्षांनी विरोध केला. परंतु, त्यांना मंदिराच्या बांधकामाची वैधता सिद्ध करता आली नाही. मंदिर बांधण्यात आलेली जागा सरकारची तेथील बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नाही, असे सुनावणीत स्पष्ट झाले. परिणामी, न्यायालयाने सावरकर यांना दिलासा देण्यास नकार दिला.
अधिक वाचा : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची शाखा नागपुरात सुरू होणार