नागपूर मध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई पुन्हा सुरू

Date:

नागपूर : गेल्या पंचवीस दिवसांपासून अनधिकृत धार्मिक स्थळावरील स्थगित केलेली कारवाई महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने पुन्हा सुरू केली आहे. न्यायालयाने या संदर्भात फटकारल्यानंतर ही कारवाई सुरू केली असली तरी अतिक्रमण पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून महापालिकेने चारपैकी केवळ एका धार्मिक स्थळावर तर नासुप्रने पाचपैकी तीन धार्मिक स्थळावर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली.

गेल्या महिन्यात शहरातील विविध भागातील कारवाईत २०० पेक्षा अधिक धार्मिक स्थळे नष्ट केली होती. नंतर ती थंबली. दोन दिवसांपूर्वी न्यायलयाने महापालिका आणि नासुप्रला कारवाई का थांबवली, अशी विचारणा केल्याने ऐन श्रावण महिन्यात ही कारवाई पुन्हा सुरू केली. महापालिकेचे पथक सकाळी जुनी शुक्रवारी भागातील रस्त्याच्या कडेला असलेले धार्मिक स्थळ पाडण्यासाठी गेले असताना तेथील नागरिकांनी विरोध केला. चुनाभट्टी येथील गोडाऊनजवळील धार्मिक स्थळ पाडण्यात महापालिकेला यश आले. मात्र, त्या ठिकाणी परिसरातील लोकांनी विरोध केला. न्यू कॅन्सर रुग्णालयाजवळ, नवीन शुक्रवारी काका हार्डवेअर समोरील आणि गाडीखाना भागातील धार्मिक स्थळांवर कारवाई न करता पथक परतले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षतीपथकाने उत्तर नागपुरातील पंचवटीनगर, विटाभट्टी रोड, इंदिरा माता नगर, बिनाकी झोपडपट्टी, आनंद नगर, बिनाकी या ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली. पंचवटीनगरातील पथकाला विरोध केला. यावेळी परिसरातील लोक कारवाई टाळण्यासाठी बुलडोझर वर चढले होते मात्र पोलिसांनी सर्वाना खाली उतरविले. त्यानंतर मंदिरात ठिय्या आंदोलन झाल्यावर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक स्थळांवर नासुप्रतर्फे कारवाई सुरू होती. महापालिकेच्यावतीने अशोक पाटील तर नासुप्रचे पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, क्षतीपथक प्रमुख मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.

अधिक वाचा : सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...