नागपुरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची धडक, अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवर भरधाव वेगाने दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर एकमेकांना जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी भावसार चौकात झालेल्या या अपघाताचे चित्रण सीसीटीव्ही चित्रण झाले. हा अपघात एतका भिषण होती की, एका दुचाकी स्वाराचे डोके मेट्रोच्या खांबावर आपटले आणि तो यात गंभीर जखमी झाला.

अभिजीत जंगम (२१ ) आणि मोहम्मद जुबैर मोहम्मद साबिर (२० ) अशी मृत तरुणाचं नाव आहेत. अभिजीत जंगम आणि त्याचे दोन अन्य मित्र जुबैर आणि शिवम यांच्यासोबत ट्रिपल सिट पल्सरने भरधाव वेगाने सेंट्रल एव्हेन्यूवरून जात होते. गांधीपुतळ्यापासून ते अग्रेसेन चौकाच्या दिशेने जात असताना भावसार चौकत चितार ओळीतून एक दुचाकीस्वार आला, तोही वेगाने होता. या दुचाकी स्वारांचे चौकात एकमेकांना धडक लागली.

या अपघातत अभिजीत आणि जुबैरचं डोके मेट्रो पिलरला जावून आदळले. यात दोघांचा मृत्यू झाला. तर शिवम आणि दुसरा बाईकस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात सीसीटीव्हीच चित्रित झाला आहे. हे दोन्ही बाईकस्वार भरधाव वेगाने जात होते, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. हा संपूर्ण परिसर वर्दळीचा असतो. तरीही हे दोन्ही बाईकस्वार वेगाने बाईक चालवत होते.