नवी दिल्ली, 16 जून 2020 : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील सर्व (केंद्र, राज्य सरकारी आणि खाजगी) रुग्णालयांमध्ये कोविडमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या कामाला आता वेग आला आहे. यासंदर्भात दि.14 जून रोजी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या प्रश्नावर चर्चा झाली होती.
या बैठकीत अमित शहा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हे कार्य करण्यात येत आहे. बहुतांश मृत व्यक्तींच्या नातेवाइकांच्या तसेच स्नेहींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सहमतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आता केवळ 36 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे बाकी आहे. या 36 जणांचे जवळचे नातेवाईक दिल्लीमध्ये वास्तव्य करीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर किंवा त्यांनी सहमती दिल्यानंतर या मृतदेहांवर उद्यापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
यापुढे कोणत्याही कारणाने मृतांवर अंत्यसंस्कार करण्याच्या कामात विलंब केला जावू नये, असे कठोर निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
Also Read- गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद, तर चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू