अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर सत्र २०१८-१९ साठी निवडलेली नवी कार्यकारिणी डॉ. हरीश वरभे, लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक अध्यक्ष, डॉ. अजय अंबाडे सचिव, व चमू यांचा पदग्रहण सोहळा रविवारी १५ जुलै २०१८ रोजी हॉटेल सेन्टर पॉईंट रामदासपेठ येथे थाटात पार पडला. सल्लागार नेत्ररोग चिकित्सक डॉ. अजय अंबाडे यांनी सचिव पदाची सूत्र स्वीकारले.
अकादमी हि ५२ वर्ष जुनी प्रतिष्ठित वैद्यकीय चिकित्सकांची संगठना असून २००० हुन अधिक विशेषज्ञ व अतिविशेषज्ञ यांची सदस्यता असलेली देशातील एकमेवा प्रतिष्ठान आहे. शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण कार्यक्रम व समाजसेवा प्रकल्प संस्थेमार्फत आपल्या मध्य भारतात राबवण्यात येत असतात.
पदग्रहण करणारे अन्य सदस्य या प्रमाणे होते. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद गांधी, माजी मानद सचिव डॉ. राजेश अटल, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र सरनाईक, सहाचिव डॉ. प्रशांत राहते व डॉ. संजय चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. संजय जैन.
कार्यकारी संचालक मंडळावर डॉ. अनुराधा रिधोर्कर, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. दिनेश सिंग, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. मनीष बाहेती, डॉ. मनोज पाहूकर, डॉ मेघना अग्रवाल, डॉ. नयनेश पटेल, डॉ. पंकज हरकुत, डॉ. सचिन देवकर, डॉ. सागर येळणे, डॉ. सुशील मानधनिया, डॉ. स्वप्नील देशपांडे, डॉ. वैशाली खंडाईत.
यंदाचे अकॅडेमी चे घोषवाक्य “सर्वोत्तम कडे वाटचाल” असे ठरविण्यात आले.
पदरोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई चे हॉस्पिटलचे रक्तविकार विभाग प्रमुख प्रख्यात रक्तदोष विशेषज्ञ व मुंबई हिमॅटॉलॉजि ग्रुप चे अध्यक्ष डॉ. एम बी अग्रवाल उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून इंडियन सोसायटी ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन चे अध्यक्ष डॉ. आर एन मकरू उपस्थित होते.
पद्ग्रहणापूर्वी विशेष सत्रात डॉ. निषाद धाकते व डॉ. अवतार किशन गंजू हे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आलेल्या रुग्णांवर चिकित्सा व प्रतिसाद यावर आपले मत मांडले. डॉ. रिया बल्लीकर व डॉ. श्रीराम काणे हे पीठासीन अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
पदरोहण कार्यक्रमोपरांत निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्र भरवण्यात आले. यात डॉ. हरीश वरभे यांनी अध्यक्षीय व्याख्यानात “सुरक्षित रक्तदानाकडे वाटचाल” वर मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. माकरू व डॉ. शरद देशमुख हे अध्यक्षता केली. यंदा संस्थेच्या ५० वर्षाच्या वेळी झालेल्या सुवर्णजयंती प्रित्यर्थ प्रथमच एक व्याख्यान मला सुरु करण्यात येत आहे.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत टाटा ट्रस्ट व एनसीआय मध्ये सामंजस्य करार संपन्न