नागपूर : मनपातर्फे संचालित ‘आपली बस‘ या प्रकल्पांतर्गत शहरात धावत असलेल्या रेड बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना व अवलंबित दिव्यांगांच्या सोबत असलेल्या प्रवाशांना शनिवार, २ मार्चपासून नि:शुल्क प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. या प्रवासासाठी दिव्यांग प्रवासीजवळ असलेले प्रमाणपत्र (समाजकल्याण विभागाद्वारे निर्गमित केलेले), रेड शहरबसचा नियोजित कामगिरीवर असलेल्या वाहकांना दाखविणे आवश्यक आहे. जेणेकरून, या प्रमाणपत्राची खात्री वाहकाद्वारे केल्यानंतर नि:शुल्क प्रवासाचे तिकीट देणे शक्य होईल.
परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवासासाठीची योजना तयार केली होती. त्यानुसार समाजकल्याण विभागाने दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर आता प्रत्यक्षात मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. मनपाने दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाहकास दाखवून नि:शुल्क प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक वाचा : नागपुरात ई-कार अवघ्या पन्नास!