अखेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जखमी पतीचाही मृत्यू…

Date:

नागपूर : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पती रविंद्र हरीराम नागपुरे (वय 47) याने पत्नी मिना (वय 40) यांच्यावर गोळीबार करून खून केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत रवी यांना मुलाने मेडिकलमध्ये दाखल केले होते. मात्र, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास रवीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी रवीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर आत्महत्या केल्याची नोंद केली.

रवी नागपुरे हा प्लायवूडचा व्यापारी होता. त्याचा गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय चौपट झाला होता. त्यात त्याचा पत्नीशी वाद झाला झाला. कौटूंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीड महिन्यांपूर्वी मीना या मुलगा अनिकेत (वय 17) याला घेऊन सक्‍करदरा हद्‌दीतील दत्तात्रय नगरात राहायला आल्या होत्या. त्यांनी न्यायालयात पती रवीविरूद्ध खटलाही दाखल केला होता. त्यामुळे पती-पत्नीत पुन्हा वितृष्ठ निर्माण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून मीना या रवि याला पैशाची मागणी करीत होत्या. मात्र, रवी पैसे देण्यास नकार देत होता. मंगळवारी रात्री दहा वाजता रवी कारने दत्तात्रय नगरातील पत्नीच्या घरी आला. त्यावेळी त्या जेवन करीत होत्या तर मुलगा अनिकेत टीव्ही बघत होता. दरम्यान रवी घरात आला. त्याने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पाठीमागे लपविलेली पिस्तूल काढली आणि मीनाच्या गोळीबार केला. मीना यांच्या छातीत गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःवरही दोन गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ALSO READ : Man shoots wife to death in Sakkardara, tries to kill self

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related