बिबट्या वाघाच्या हल्ल्यात बौध्द भिक्षु ठार : गावकऱ्यांमध्ये दहशत

Date:

नागपुर : चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर जवळील संघरामगिरी – रामदेगी येथे एका बौद्ध भिक्षुवर बिबट्या वाघाने हल्ला करुण ठार केले. माहिती नुसार तिन बौध्द भिक्षु दुपारी १२: ३० च्या दरम्यान रामदेगी येथे ध्यान साधनेला बसले होते. ध्यानात मग्न असतांनाच्या दरम्यान भंते राहुल बोधी यांच्यावर बिबट्या वाघाने अचानक हल्ला चढविला, त्या हल्ल्यात भंते राहूलबोधी यांचा मृत्यु झाला. या घडलेल्या घटनेच्या एका  दिवसापुर्वी देखील सकाळी ६.३० च्या सुमारास रामदेगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात राळेगाव येथील संजय तितरे यांना जीव गमावावा लागला होता.घटनेची माहिती मिळताच घटना स्थळावर गावकऱ्यांनी धाव घेतली. वन विभागाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते. या दु:खद घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच बौध्द अनुयायांमध्ये कमालीचे शांतीमय वातावरण झाले असून या घटनेने संघरामगिरी परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

अधिक वाचा : नागपुरात रोजगार घोटाळा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related