नागपुर : गुरूवार ला झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे पैनगंगा नदीत पांच युवक नदीत बुडाल्याने या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तर दोघे पोहून बाहेर आल्याने थोडक्यात बचावले. माहिती नुसार सेल्फी घेण्याच्या नादात नाव उलटल्याने ही घटना घडली. मांगली येथील मोहरम उत्सवासाठी हे तरुण तेलंगणाहून आले होते.
माहिती नुसार यवतमाळ जिल्ह्यात मांगली येथील मोहरम प्रसिद्ध आहे. या मोहरमसाठी दूरदूरून लोक येतात. यावर्षीही तेलंगणातून बरेच लोक मांगली येथे आले होते. १९ सप्टेंबरला रात्रभर मोहरमचा उत्सव साजरा करण्यात आला. आज आदिलाबाद येथील शेख आर्षद (१४), शेख सफिर सिराज (१६), सय्यद उमेद अजीम (१८) हे त्यांच्या दोन मित्रांसह राजूर गावाजवळील नदीच्या घाटावर गेले. तेथे असलेली होडी घेऊन ते नदीच्या पाण्यात गेले. तिथे सेल्फी काढण्याच्या नादात होडी नदीत पलटी झाली.
होडी पाण्यात पलटी झाल्यावर पाच तरुणांपैकी दोन तरुण पाण्यातून पोहत बाहेर पडले. नाव पलटल्याची माहिती राजूर (गोटा) येथील गावकऱयांना मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बुडणाऱ्या तरुणांना बाहेर काढले.
तिघांना नदीच्या बाहेर काढून मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शेख आर्षद व शेख सुफिर सिराज या दोघांना मृत घोषित केले. तर बाहेर काढलेल्या सय्यद उमेद अजीम याची प्रकृती गंभीर आहे.
अधिक वाचा : कळमेश्वर – सावनेर मार्गावर मोहरम निमित्त दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात : पाच प्रवाशी मृत