हार्दिक पांड्याचा अष्टपैलू टॅग काढून घ्या : हरभजन सिंग

Date:

इंग्लंडकडून पहिल्या दोन कसोटीत लाजिरवाणा पराभव भारतीय संघावर चाहते आणि माजी खेळडूंकडून जोरदार टीका सुरु आहे. त्यातच भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ने आपला मोर्चा अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे वळवला. त्याने हार्दिकच्या दोन्ही टेस्टमधील कामगिरीचा खरपूस समाचार घेत पांड्याला ऑल राउंडर म्हणून संबोधणे बंद करायला हवे, असे वक्तव्य केले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या तिन्ही अष्टपैलू खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारताला चांगलेच धक्के दिले. पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सने प्रभावी मारा करत भारताच्या कसलेल्या फलंदाजीला खिंडार पाडले. हेच काम त्याच्या गैरहजेरीत ख्रिस वोक्सने दुसऱ्या कसोटीत केले. याचबरोबत वोक्सने कसोटीतील आपले पहिले शतक झळकावले. यांच्या साथनेच सॅम कुरन या अवघ्या तीन कसोटी खेळलेल्या ऑल राउंडर खेळाडूने पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात ४ गडी बाद केले तर बॅटिंग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.या उलट भारताचा मध्यमगती गोलंदाज आणि स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हार्दिक पांड्या जलदगती गोलंदाजीला पोषक वातावरण असणाऱ्या इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी करेल असा अंदाज जाणकार करत होते. पण, पांड्याने दोन्ही कसोटीत निराशा केली.

 

हार्दिकच्या या अपयशावर बोट ठेवत हरभजन सिंग म्हणाला की, पांड्याने फलंदाज म्हणून निराशा केली आहे. तसेच गोलंदाजी करताना त्याची कामगिरी म्हणावी तशी झालेली नाही.

गोलंदाज म्हणून कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास नसल्याचे दिसून येते.’ हरभजन सिंग इंग्लंडच्या तीन ऑल राउंडरचे उदाहरण देत म्हणाला ‘हार्दिक पांड्या जर या अनुकुल वातावरणात गोलंदाजी करु शकत नाही तर त्याचे संघातील स्थान भविष्यात धोक्यात येऊ शकते. आपण त्याच्यावर लावलेला ऑल राउंडर हा टॅग काढून घ्यायला हवा. ज्याप्रमाणे इंग्लंडच्या तिन्ही ऑल राउंडरनी जशी कामगिरी केली तशीच कामगिरी हार्दिक पांड्याकडून अपेक्षित आहे. तो एका रात्रीत कपिल देव होऊ शकत नाही.’

अधिक वाचा : Ind vs Eng: विराट कोहली फिट झाला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद?

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related