राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना सरकारी सेवेत थेट नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्य क्रीडा विभागाला दिले. कुस्तीपटू राहुल आवारे याचीही थेट नियुक्ती व्हावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वसाधारण खेळाडूंच्या प्राप्त ९८ अर्जापैकी २३ आणि दिव्यांगांमधून प्राप्त २६ अर्जापैकी १० अशा ३३ खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागात गट ‘अ’ ते गट ‘ड’ प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.
या खेळाडूंमध्ये ललिता शिवाजी बाबर (अॅथ्लेटिक्स), जयलक्ष्मी सारीकोंडा (तिरंदाजी), भक्ती अजित आंब्रे (पॉवरलिप्टिंग), अंकिता अशोक मयेकर (पॉवरलिप्टिंग), अमित उदयसिंह निंबाळकर (पॉवरलिप्टिंग), सारिका सुधाकर काळे (खो-खो), सुप्रिया भालचंद्र गाढवे (खो-खो), विजय सदाशिव शिंदे (पॉवरलिप्टिंग), राहुल बाळू आवारे (कुस्ती), मोनीका मोतीराम आथरे (अॅथ्लेटिक्स), स्वप्नील त्र्यंबकराव तांगडे (तलवारबाजी), आनंद दामोदर थोरात (जिम्नॅस्टिक्स), सिद्धार्थ महेंद्र कदम (जिम्नॅस्टिक्स), मानसी रवींद्र गावडे (जलतरण), नेहा मिलिंद साप्ते (नेमबाजी), रोहित राजेंद्र हवालदार (जलतरण), युवराज प्रकाश जाधव (खो-खो), बाळासाहेब सदाशिव पोकार्डे (खो-खो), कविता प्रभाकर घाणेकर (खो-खो), सचिन आनंदा चव्हाण (नेमबाजी), संजीवनी बाबुराव जाधव (अॅथ्लेटिक्स), देवेंद्र सुनील वाल्मिकी (हॉकी), सायली उदय जाधव (कबड्डी) यांचा समावेश आहे. दिव्यांग खेळाडूंमध्ये सुयश जाधव (जलतरण), लतिका माने (पॉवरलिप्टिंग), प्रकाश तुकाराम मोहारे (पॉवरलिप्टिंग), इंदिरा सत्ताप्पा गायकवाड (पॉवरलिप्टिंग), सुकांत इंदुकांत कदम (बॅडमिंटन), मार्क धरमाई (बॅडमिंटन), रूही सतीश शिंगाडे (बॅडमिंटन), दिनेश वसंतलाल बालगोपाल (टेबलटेनिस), ओम राजेश लोटलीकर (टेबलटेनिस) आणि कांचनमाला पांडे (जलतरण) यांना सरकारी नोकरीची संधी मिळाली आहे.
अधिक वाचा : सायना चा विक्रमी विजय