नागपुर :- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक २८ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत रोज संध्याकाळी ६:३० वाजतासंगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर समारोह नेहमीप्रमाणे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिविल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. समारोहामध्ये तीन दिवस शास्त्रीय गायन-वादन आणि संगीत-नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
दिनांक२८ जुलै रोजी सामवेदातून संगीत हा कार्यक्रम आंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि साथी वाद्यवृंद वकलाकार सादर करतील. आरतीजींनी आपल्या व्यस्त दैनंदिनीतुन वेल काढून या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल तत्काल होकर दर्शवला त्यामुलेच ही संकल्पना साकार होत आहे. या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना रेणुका देशकर, नागपूर यांची आहे
.तसेच सुप्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यानि या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे. डॉ. सुजाता व्यास यांनी या कार्यक्रमाच्या संहिता लेखनासाठी सखोल संशोधन केले आहे. सहकारी वाद्यावृन्दांमधे ज्योति हेगड़े, हुबली (रूद्र वीणा), श्रीकांत पिसे, नागपूर (हारमोनियम), संदेश पोपटकर, नागपूर (तबला), विक्रम जोशी, नागपूर, (माइनर), पलसकर गुरूजी, परभणी (साम-वेद रुचा गायन), श्रीधर कोरडे, नागपूर (पखवाज) यांचा समावेश आहे. संगीताची उत्पत्ति सामवेदातून झाली अशी मान्यता आहे. परंपरेने चालत आलेल्या शास्त्रीय संगीताच्या या परंपरेला दिग्गज कलाकारांनी आपल्या प्रतिभेने समृद्ध केले आहे. ‘सामवेदातून संगीत’ हा कार्यक्रम संगीताच्या उत्पत्ति विषयी जनमानसात असलेले कुतूहल व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच संगीत अभ्यासकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
दिनांक २९ जुलैला सावनी शेंडे-साठे, पुणे यांचे शास्त्रीय गायन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तबलावादक पं. शुभंकर बॅनर्जी, कोलकाता यांचे एकल तबलावादन होईल. सावनी शेंडे यानि कुसुम शेंडे, संजीव शेंडे अणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या सर्व गुरुंकडून शास्त्रीय गायनाची दीक्षा घेतली आहे. सावनी यांचे संगीत किराणा अणि ग्वालियर घराण्याचा उत्तम मिलाप आहे. पं. शुभंकर बॅनर्जी यांनी बनारस घराण्याचे पं. माणिक दास यांच्याकडून काही वर्षे संगीत शिक्षण घेतल्यानंतर फारुखाबाद घराण्याचे पं. स्वपन शिवा यांच्याकडून २५ वर्षे संगीताचे पाढे गिरवले. त्यांनी नोबेल शांति पुरस्कार समारोह, फेस्टिवल ऑफ़ इंडिया इन ब्राझिल, द. आफ्रिका, आशियाई फैन्टसी कॉन्सर्ट, जपान तसेच लंडन मधे सिंफनी ऑर्केस्ट्रा सोबत त्यांचे सादरीकरण प्रसिद्ध आहे.
तर दिनांक ३० जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित तसेच प्रमोद पवार दिग्दर्शित संन्यस्त खङग हे मराठी संगीत नाटक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कलाकारांद्वारेसादर करण्यात येईल. या नाट्यकृतीमध्ये अमोल बावडेकर, संपदा माने, भरत चव्हाण इत्यादी गायक कलाकार भूमिका साकारतील. मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेद्वारे या नाट्यकृतिची पुनार्निर्मिति करण्यात आली आहे. या नाटकाला
८० वर्षांपूर्वी मा. दीनानाथ मंगेशकरांनी संगीत दिले होते. शत जन्म शोधिताना, मर्मबंधातातली ठेव, सुकतातातची जगी या सुप्रसिद्ध काव्यपदांसमवेत अन्य पदांचा सुद्धा या नाट्यकृति मधे समावेश आहे. या संगीत समारोहाची देणगी प्रवेशपत्रिका दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात दिनांक २३ जुलै पासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असेल. सदर प्रवेशपत्रिका समारोहाच्या तिन्ही दिवसांसाठी वैध असून याकरीता प्रति व्यक्ति फक्त रुपये २००/- एवढेनाममात्र देणगी शुल्क ठेवण्यात आले आहे. तरी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचा रसिकजन आणि नागपूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन दमक्षेसां. केंद्र, नागपूरच्या वतीने रसिकांणा करण्यात आले आहे.
अधिक वाचा : Diamonds Forever – Unforgettable Melodies of Kisore Kumar-Pancham- Gulzar