हरभजन सिंग चा संदेश : सोच बदलो, देश बदलेगा
रशियातील मास्को येथे काल झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने क्रोयोशियावर ४-२ ने मात करून फ्रान्सने वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर नव्याने नाव कोरले. फ्रान्स १९९८ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषका आपल्या काबीज केला आहे. खरा विश्चचषक फ्रान्सने जिंकला असला तरी सर्व जगाचे मन हे क्रोयशिया देशाने जिंकले आहे. कारण देखील तसेच आहे.
पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या या छोट्याशा क्रोयशिया देशाची लोकसंख्या केवळ ५० लाख इतकीच हा देश नव्वदीच्या दशकात गृह युध्दाने ग्रस्त होता. त्यामुळे सर्वच क्रोयशियन युध्दाच्या छायेत होते. १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या या क्रोयशिया देशाला आपली ओळख निर्माण करण्यासाठी १९९८ सालापर्यंत वाट बघावी लागली. हा छोटा देश विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला असला तरी अख्या जगाच्या मनामध्ये घर करून गेला आहे.
या देशाची चुरशीची कामगिरी पाहता नेहमीच सक्रीय असणार क्रिकेटपटू हरभजन सिंग ने एक भावुक ट्विट केले आहे. आणि हे ट्विट करत त्याने देशातील सर्व नागरिकांना संदेशदेखील दिला आहे. हरभजनने ट्विट मध्ये असे लिहले आहे की, केवळ ५० लाख इतकी लोकसंख्या असणारा देश विश्वचषक स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचतो, आणि आपल्या १३५ करोड देशाची लोकसंख्या हिंदू-मुस्लिम खेळत आहे. या भावुक ट्विटसोबत हरभजन सिंग ने ‘सोच बदलो, देश बदलेगा’ असा संदेश देखील दिला आहे.
लगभग 50 लाख की आबादी वाला देश क्रोएशिया फ़ुटबॉल वर्ल्ड कप का फाइनल खेलेगा
और हम 135 करोड़ लोग हिंदू मुसलमान खेल रहे है।#soch bdlo desh bdlega— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 15, 2018
हरभजन सिंग ने हे असे ट्विट करून देशात पसरलेल्या दुषीत वातवरणाची नागरिकांना जाणीव करून दिली आहे. रोज एक ना एक तरी हिंदू-मुस्लिमच्या लढ्यांची घटना ऐकायला मिळते.
ALSO READ :BREAKING: France Win World Cup 2018