इन्स्टाग्राम द्वारे कमी किमतीत आय फोनचे खरेदीचे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यास पुणे येथून अटक
नागपूर : इस्टाग्राम साइडचा वापर करीत असताना फियार्दीना ही firstcopyphones2 आयडी दिसली. त्यावर फिर्यादिनी किल्क केल्यावर ऑनलाईन मोबाईल हेडसेट विक्रीसाठी असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामध्ये व्हॉटसअॅप अकाउंट नं . ८०८७८७१२५४, ८९९९९०२४१९ असे दिसून आले.त्यावर फिर्यादीनी फोन करून संपर्क साधला असता यातील आरोपीने ‘व्हॉटसअॅप करो’ असे फिर्यादीला सागितले. म्हणून फिर्यादीनी आरोपीच्या व्हॉटसअॅप नं .८९९९९०२४१९ चाट केली आणि वेगवेगळ्या मोबाईल फोनच्या किमती विचारल्या असता आरोपीने फिर्यादीनी माहिती दिली होती.
तसेच I PHONE MAT BLACK मोबाईल फोनची किमत इस्टाग्रामवर ५,५००/- रुपये होती आणि ३००/- रुपये कुरीअर चाजेस अशी असल्याचे पाहून फिर्यादीनी त्यांच्या दुसऱ्यादिवशी व्हॉटसअॅप द्वारे कॉन्टक्ट करून नमूद मोबाईल हेडसेट ऑडर केला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीनी ऐसे नही होतो है असा व्हॉटसअॅप मॅसेज पाठवून फिर्यादीचे पुन नाव, पत्ता व इतर माहिती पाठविण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादीनी आरोपीला व्हॉटसअॅपवर माहिती दिली असता आरोपीने ऑडर डीस्पच करीत असलेबाबत सागितले.परंतु अर्धे पैसे पेटीएम द्वारे आरोपीजवळ जमा करण्यास सागितले म्हणून फिर्यादीनी दिनाक १२/१२/२०१७ ते १५/१२/२०१७ च्या दरम्यान रु २,२००/- पटीएम द्वारे त्यांच्या मोबाईल नं ८९९९९०२४१९ वर पाठविले
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला मॅसेज पाठवून ऑडर पाठवीत असलेबाबत माहिती देऊन ऑडर डिस्पच झाल्याची माहिती डिस्पच नंबर देखील दिला. त्यानंतर दोन दिवसामध्ये आरोपीने फिर्यादीला मोबाईलवर फोनकरून माहिती दिली की, ‘आपला ऑडर आ चुका हैआप रिसीव्ह कर सकते है किंतु जब तक आप पुरा पेमेंट नही करते तब तक आपको ऑडर की स्लीप नही मिलेगी’ त्यावरून फिर्यादिनी दिनाक १६/१२/२०१७ रोजी वडिलांच्या मोबाईल क्र. ९८२२९२६६८४ वरून रू. ३.६००/- पेटीएम द्वारे आरोपीच्या मोबाईल नं. ८९९९९०२४१९ वर पाठविले.परंतु आरोपीने फिर्यादीला ऑडर केलेल्या फोनची रिसीट दिली नाही आणि दोन्ही फोन बंद केले.
गुन्ह्याचे तपासादरम्यान सायबर सेलचे सपोनि/ विशाल माने, पोशी/अश्विन चौधरी यांनी आरोपीच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे तसेच मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता आरोपी पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यास पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर , पोनि/ भानुदास पिदुरकर, पोनि/विजय करे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/रंजन सावंत, सपोनि/प्रशांत भरते,पोह्वा/३६७८ संतोषसिंह ठाकूर, पोशी/७०७४ महेन्द्र सेलूकर यांचे पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले व त्यास मा. न्याल्यातील ०३ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजून केला आहे.
अधिक वाचा : नागपूर येथे जिव्हाळा फाऊंडेशन चे आयोजन – शेकडो रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ