मार्च नंतरच ओसरणार कोरोना ची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा

Date:

कानपूर : देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे.मार्च नंतरच ओसरणार कोरोना ची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा. या काळात दररोज 4 ते 8 लाख नवे रुग्ण आढळतील. दिल्ली आणि मुंबईत 15 जानेवारीला रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल.

‘आयआयटी’तील (कानपूर) गणित आणि संगणक विज्ञान या विषयांचे प्रा. मनींद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तविला असून, या संशोधनासाठी त्यांनी संगणकीय पद्धत वापरली आहे. प्रा. अग्रवाल यांनी 15 मार्चच्या जवळपास लाट ओसरण्यास सुरुवात होईल, असेही नमूद केले आहे.

देशात फेब्रुवारी महिन्यात दररोज 8 लाख रुग्ण
मुंबईत मार्च नंतरच ओसरणार कोरोना ची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा रुग्णसंख्येची उसळी 15 जानेवारीला होईल. दिल्लीतही असेच घडेल. आमच्याकडे संपूर्ण देशाची आकडेवारी नसली; तरी सुरुवातीचे जे काही आकडे उपलब्ध आहेत, त्यावरून फेब्रुवारीत तिसर्‍या लाटेचा ‘पीक’ येणार, असा स्पष्ट अंदाज बांधण्यास वाव आहे.

लॉकडाऊन परिणामकारक
पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन लागू होता. प्रादुर्भावाचा वेग त्यामुळे दुपटीने कमी झाला. दुसर्‍या लाटेत प्रत्येक राज्याने आपापल्या परीने धोरणे राबविली. ज्या राज्यांनी लॉकडाऊन (मग तो अंशकालीन का असेना) लागू केले, त्या राज्यांतून प्रादुर्भावाचा वेग कमी झाल्याचे पाहायला मिळाले. याचाच अर्थ लॉकडाऊन हा संक्रमण रोखण्याचा एक पर्याय आहेच, असे प्रा. अग्रवाल यांनी सांगितले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related