Sputnik V ही रशियन बनावटीची लस आहे. त्या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसीच्या एका डोसची किंमत 995 रूपये असणार आहे. भारतात या लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये डॉ. रेड्डी यांनी घेतला आहे. एका डोसची किंमत 995 रूपये इतका असणार आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्ज लॅबरोटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. डॉ. रेड्डीज लॅबरोटरीजने स्टॉक एक्सचेंजलाही स्पुटनिक व्ही या लसीच्या डोसच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. 11 ऑगस्ट 2020 रशियाने या लसीची नोंदणी केली होती. ही कोरोना विरोधातली जगभरातली पहिली लस आहे. या लसीचे 30 लाख डोस हे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत दाखल होणार आहेत.
पुढच्या आठवड्यापासून भारतात Sputnik V ही रशियाची लस उपलब्ध होणार आहे. दोन बिलियन डोस पुढील पाच महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून Sputnik V या लसीची विक्री भारतात सुरू होणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यापासून भारतात या लसीचं उत्पादित होऊन लस मिळू शकणार आहे.
देशात कोरोनाचं संकट गहिरं झालं आहे. यासंदर्भात आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल, डॉ. बलराम भार्गव, आयसीएमआर आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते.
भारतात जेव्हा या लसीच्या निर्मितीला सुरूवात होईल तेव्हा कदाचित या लसीच्या डोसची किंमत कमी होऊ शकते. भारतात लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. नीती आयोगाच्या एका सदस्याने डिसेंबरपर्यंत देशात कोव्हिड व्हॅक्सिनचे 200 कोटीहून अधिक डोस भारतात उपलब्ध होतील असा दावा केला आहे.