कोरोना व्हायरस महामारीच्या सुरूवातीच्या काळापासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये शोध सुरू आहेत. ज्यांचे निष्कर्ष सायन्स जर्नल आणि इतर प्लॅटफॉर्मवरूनही ते प्रकाशित होत आहेत. अशात नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला ‘ब्रेकथ्रू केस’ असं नाव दिलंय. आपल्या देशाबाबत सांगायचं तर याबाबतीत भारतीय लोक बरेच नशीबवान आहेत. कारण भारतात अशा केसेस कमी आहेत.
एक्सपर्ट आणि सरकारचा सल्ला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, भारतात अशाप्रकारच्या ब्रेकथ्रू केसेची आकडेवारी केवळ ०.०५ टक्के इतकीच आहे. तेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, जर वॅक्सीनचा पहिला डोज लावल्यानंतर कुणी कोरोनाने संक्रमित होत असेल तर याचा अर्थ हा नाही की, ती व्यक्ती दुसरा डोज घेऊ शकत नाही. अशा लोकांनी फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी की, दुसऱ्या डोजचं शेड्युल संक्रमणातून ठीक झाल्यावर म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कमीत कमी चार ते आठ आठवड्यांनंतर असावं.
कुणासाठी हे नियम? आरोग्य मंत्रालयानुसार, असे लोक ज्यांना कोरोना संक्रमणाची सक्रिय लक्षणे आहेत किंवा असे लोक ज्यांच्या शरीरात कोविड-१९ विरोधात अॅंटीबॉडी आहेत. त्यांच्यासाठी दुसरा डोज घेण्याआधी ४ ते ८ आठवड्यांचा गॅप गरजेचा आहे. तेच प्लाज्मा घेतलेल्या लोकांसोबत जास्त आजारी किंवा इतर आजारांनी ग्रस्त लोकांनीही वॅक्सीनचा दुसरा डोज घेण्यात एक किंवा दोन महिन्यांचा गॅप ठेवावा.
तसेच अमेरिकन रोग नियंत्रण केंद्र म्हणजे CDC नुसार, असे रूग्ण ज्यांना काहीच लक्षणे नाहीत, म्हणजे कोविड-१९ ने ग्रस्त रूग्ण ठीक झाल्यानंतर आपला होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केल्यावर कोरोना वॅक्सीनचा दुसरा डोज घेऊ शकतात.
दरम्यान एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, वॅक्सीनच्या कार्यप्रणालीचाही आपला एक वेगळा प्रभाव असतो. सर्वांची सुरक्षा सतत आणि चांगली होत रहावी यासाठी वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कुणी कोरोना व्हायरसने संक्रमित होत असेल तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही.