COVID 19 अमरावती
कोरोनानंतर आता म्युकर मायकॉसिस या दुर्मीळ आजाराचे रुग्ण अमरावतीत आढळून आले आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या नागरिकांत हा आजार बळावल्याने चिंतेत भर पडली आहे. COVID19 जिल्हा सामान्य रुग्णालयात या चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
म्युकर मायकॉसिस हा एक प्रकारचा दुर्मीळ फंगल इन्फेक्शनचा आजार आहे. तो मुख्यत: जबड्यात, नाकात व डोळ्यात आढळून आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. COVID19 ईएनटी सर्जन डॉ. श्रीकांत महल्ले यांनी एन्डोस्कोपीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली.
COVID19 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पथकात भूलतज्ज्ञ डॉ. संजय खेरडे, डॉ. बागवाले, स्वाती बाहेकर, के. जी. देशमुख, डॉ. सुजित गांगोरे यांचा समावेश होता.
आजाराची लक्षणे
म्युकर मायकॉसिस या आजारावर उपचार पद्धती ही खर्चिक आहे. कोव्हिडग्रस्त तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराची लवकर लागण होऊ शकते. या रुग्णांना डोकेदुखी, दृष्टी कमी होणे या डोळ्यांच्या आजारासह सायनस, जबड्यात वरच्या भागात दुखणे व दातात पस होऊन दात हलणे, नाकामधून रक्तमिश्रित पस येणे, नाक बंद होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.