नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागपूर विभागात राबविण्यात आलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनासोबत कोविड हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांवरील औषोधोपचारामुळे बरे होण्याच्या प्रमाणाबरोबर मृत्यूदरही राज्यात सर्वाधिक कमी ठेवण्यात नागपूर विभागाला यश आले आहे. या विभागात ७०.१५ टक्के रुग्ण बरे झाले असून मृत्यूचे प्रमाण केवळ ०. ९१ टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
या विभागात १ हजार ६४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ हजार १५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण हे ०.१९ टक्के एवढे आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७०.१५ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात १ हजार ३२० रुग्ण बाधित असून ९२७ रुग्णांवर उपचार करुन त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०. २३ टक्के तर मृत्यूचे प्रमाण ०.९८ टक्के एवढे आहे. गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण दगावला नाही. कोरोना बाधितांपैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये गोंदिया ६८. ६३ टक्के, भंडारा ६३. ६४ टक्के, गडचिरोली ७३. ७७ टक्के, चंद्रपूर ७५. ७४ टक्के तर वर्धा जिल्ह्यात ७१. ४३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक बरे होण्याचे प्रमाण नागपूर मंडळाबरोबर लातूर मंडळात ६६. २८ टक्के, कोल्हापूर ७५.९७ टक्के, अकोला ६२. ९२ टक्के, औरंगाबाद ५८.४८ टक्के, नाशिक ५५. ८७ टक्के, पुणे ५४. ०८ टक्के तर ठाणे मंडळात ४७. १३ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Also Read- Maharashtra, Delhi Among 5 States To Receive First Batch Of COVID-19 Drug