नवी दिल्ली, 23 जून 2020 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले की, “दिल्ली मधील राधा स्वामी ब्यास मध्ये 10,000 खाटांच्या कोविड दक्षता केंद्राचे परिचालन 26 जून पासून सुरु होईल. याचे काम जोरात सुरु असून या सुविधा केंद्राचा एक खूप मोठा भाग शुक्रवारपर्यंत कार्यान्वित होईल”.
अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरात आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून छत्तरपूरमधील राधा स्वामी सत्संग ब्यास परिसरातील कोविड दक्षता केंद्राची पाहणी करण्याचे आमंत्रण दिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या केंद्रामध्ये आयटीबीपी आणि लष्कराचे डॉक्टर आणि परिचारिका तैनात करण्याची विनंती केली आहे. अमित शहा म्हणाले की, “तीन दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून राधा स्वामी ब्यास येथील कोविड दक्षता केंद्राच्या क्रीयान्वयानाचे काम आयटीबीपीला देण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “कोविड रुग्णांसाठी 250 आयसीयू खाटांच्या सुविधेसह 1,000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय पुढील आठवड्यात तयार होईल”. “केंद्र सरकारच्या सहकार्याने डीआरडीओ आणि टाटा ट्रस्ट हे सुविधा केंद्र उभारत आहेत. या केंद्रात सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना तैनात केले जाईल. हे कोविड दक्षता केंद्र पुढील 10 दिवसांमध्ये तयार होईल,” असे अमित शहा म्हणाले.
त्याव्यतिरिक्त, “दिल्लीतील रेल्वे कोचमध्ये असणाऱ्या कोविड रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सशस्त्र दलाच्या जवानांना तैनात केले आहे. आहे”, असे अमित शहा म्हणाले. “आवश्यकतेनुसार कोविड दक्षता केंद्र बनविण्यासाठी दिल्ली सरकारला 8,000 अतिरिक्त खाटा आधीच देण्यात आल्या आहेत,” असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
यासह, पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये कोविड रूग्णांसाठी 250 आयसीयू खाटांसह सुमारे 20,000 खाटांची सुविधा उपलब्ध होईल.
Also Read- Coronavirus महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढल्याने थोडा दिलासा; रुग्णवाढ कायम