नागपुर : नागपुर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्त्याने वाढत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ५ मधील तुलसीनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये यासाठी सोमवारी या परिसरातील वस्त्या सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र असे
उत्तरपश्चिमेस-बुरहानी मंजिल, भिवगडे कॉलेज
उत्तरपूर्वेस -तुलसीनगर गार्डन गेट
दक्षिणपूर्वेस -शांतिनगर बस स्टॉप
दक्षिणपश्चिमेस -इंदिरा गांधी पुतळा
Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात लागोपाठ तीन मृत्यू, नऊ रुग्ण पॉझिटिव्ह