मुंबई: रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ शोचे पुन्हा प्रसारण अनेक प्रकारे संस्मरणीय ठरले आहे. 33 वर्षानंतर पुन्हा डीडी नॅशनलवर प्रसारित झालेल्या या शोने नवीन विश्वविक्रम रचला आहे. दूरदर्शनने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. 16 एप्रिल रोजी विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या दिवशी या शोला जगभरातून तब्बल 7.7 कोटी प्रेक्षक मिळाले.
ट्विटमध्ये लिहिले आहे, वर्ल्ड रेकॉर्ड, दूरदर्शनवरील रामायणाच्या पुनर्प्रक्षेपणाने जगभरातील व्युअरशिपचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हा शो सर्वाधिक पाहिलेला शो बनला आहे. 16 एप्रिल रोजी 7.7 कोटी प्रेक्षकांनी हा शो पाहिला.
विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या विशेष मागणीनुसार 28 मार्चपासून रामायणचे पुनर्प्रक्षेपण सुरु झाले आहे. रामायणने नवीन विक्रम नोंदवण्याची ही पहिली वेळ नाही. जेव्हा पहिल्यांदा हा शो प्रसारित झाला होता तेव्हा शोने प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड्स बनवले होते आणि आता 33 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
78 भागांचा रामायण हा शो वाल्मिकी रामायण आणि तुलसीदार यांच्या रामचरितमानस यावर आधारित आहे. 1987 ते 1988 पर्यंत रामायण हा जगातील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम होता. 2003 पर्यंत, शोच्या नावाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये द वर्ल्ड मोस्ट वॉच्ड मायथॉलॉजिकल सीरियल इन द वर्ल्ड या नावाने नोंद आहे.
Also Read- History Created! Zee Talkies becomes No.1 Marathi channel with highest ever GRPs