नागपूर: लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या परिवारावर गंभीर संकट आलेले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणं ठेऊन बेझनबाग इंदोरा मित्र परिवार व युवा भीम मैत्री संघ गोर गरीब कामगार व मोलकरणी यांचे मदतीला सरसावली आहे.
उपरोक्त सेवाभावी सामाजिक संस्थे तर्फे उत्तर नागपुरातील हात मजुरी व गरीब नागरिकांची यादी तयार करून समता नगर, नारी, इटभट्टी परिसर, निर्मल कॅलोणी, चंद्रिकापुरे नगर, इंदोरा, लिंबूनी नगर आदी परिसरात राहणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना तेलाचे पाकीट, चना डाळ चना, वाटाणे, डाळ, पोहे,साखर,चायपत्ती,मिरची पावडर,हळद,मसाला पाकीट, मीठ पाकीट सोयाबीनवडी आदी खाद्यपदार्थांचे पॉकेट मोठया प्रमाणात तयार करून वाटप करण्यात आले हे वाटप संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री अशोक कोल्हटकर प्रदीप बनसोड, जितू बनसोड, दीपक बवानगडे, संघपाल उपरे, डॉ अनमोल टेम्भुरने, हितेश उके, नागसेन फुलझले, राजेश रायपूरे, निशांतनागदिवे, राजेन्द्र कांबळे, धम्मपाल लांजेवार, प्रशांत भिवंगडे, बबलू माहुरे, पपु ठवरे, भारती डोंगरे, अमिताभ मेश्राम आदींच्या मार्गदर्शनाथ वाटप करण्यात आले या कार्यात जरीपटका पोलीस स्टेशन चे पोलिस मित्रांनी सहकार्य केले या नंतर असा उपक्रम चार टप्यात राबविण्याचे येणार आहे.