नागपुरात करोनाचा पहिला बळी, सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेश

Date:

नागपूर: नागपुरात ६८ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातला करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. या रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने मेयो रुग्णालयात ४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आल्यापासून त्याच्याजवळ कुणीही नातेवाईक आले नाहीत. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही नातेवाईक आले नाहीत. पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारी मृत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचां शोध घेत आहेत.

मनपा आयुक्तांनी वाढविले आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली भेट : काळजी घेण्याचा दिला प्रेमळ सल्ला

हा ६८ सतरंजीपुरा भागातील आहे. त्यामुळे सतरंजीपुरा हा भाग सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ही ४ हजाराच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८०० च्या वर गेली आहे. रुग्णसंख्या वाढणं हा चिंतेचा विषय ठरतो आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.

Also Read- ना. नितीन गडकरी ७ एप्रिलला घेणार कोरोनासंदर्भात जिल्ह्याचा आढावा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...