नागपूर: नागपुरात असलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनदरम्यान मदत व्हावी, या उद्देशाने जिव्हाळा फाऊंडेशन सरसावले आहे. विशेषत: जम्मू, काश्मीर आणि लद्दाखमधील जे विद्यार्थी नागपुरातील विविध भागात शिक्षणासाठी राहात आहेत, अशांसाठी ही सोय करण्यात आली आहे.
याअंतर्गत जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे दररोज २०० गरजूंना फूड पॅकेट व फळवाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ही व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मू-कश्मीर आणि लद्दाख येथील अनेक विद्यार्थी नागपुरात राहतात. अशा ५० विद्यार्थ्यांची किराणाची व्यवस्था जिव्हाळा फाऊंडेशनने करून दिली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी मनपाने तयार केले वेब ॲप्लिकेशन
याव्यतिरिक्त सोमवारी क्वार्टर व हनुमान नगर येथे राहणाऱ्या १० विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था संस्थेचे मार्गदर्शक माजी खासदार अजय संचेती, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार अनिल सोले, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या मागरदर्शनात संस्थेचे अध्यक्ष मनीष मेश्राम , संस्थेचे सचिव तुषार महाजन, अंगद जरुळकर , डॉ. सुमित पैडलवार, प्रदीप कदम , जयंत पाध्ये, प्रणव हळदे, आशुतोष बेलेकर, नितेश समर्थ, योगेश मधुमटके, प्रसाद हडप, अतिश रॉय, व्यकंटेश होलगरे,उदय झोडे, विलास मसरे, रिद्दु चोले, केतन साठवणे, अभिजित सरोदे, अभिजीत गावंडे, मयुर शेंडे, विनोद कोटांगळे, रोशन झाडे, अपराजित फुलझेले, नेहा लगाटे, स्नेहल कुचनकर पदाधिकारी व सदस्य करीत आहेत.
Also Read- कोरोनासंदर्भातील उपाययोजनांवर महापौरांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा