नागपूर : करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी महामेट्रोने ३१ मार्चपर्यंत मेट्रो प्रवासी सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला. २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मेट्रो धावणार नसल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे. सीताबर्डी ते खापरी आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर या २५ किलोमीटरवर सध्या मेट्रो धावत होती. करोना पसरू नये, यासाठी सुरुवातीला मेट्रोऱ्या फेऱ्या कमी करण्यात आल्या.
आता खबरदारी म्हणून ३१ मार्चपर्यंत पूर्णच मेट्रो फेऱ्या बंद करण्यात आली आहे. अर्धवट राहिलेल्या मेट्रो स्थानकाचे काम सध्यातरी सुरू राहणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
Also Read- ‘आपली बस’ सह व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आजपासून निर्बंध