महाराष्ट्रात करमुक्त झाला ‘तान्हाजी’ चित्रपट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Date:

मुंबई : अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला आणि शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ”तान्हाजी’: द अनसंग वॉरियर’ हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या बॉक्सऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करताना दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट रिलीज झाला. अवघ्या दहा दिवसांमध्ये चित्रपटाने दिड कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे. नव्या वर्षात 100 कोटींचा आकडा ओलांडणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

हा चित्रपट उत्तर प्रदेश, हरयाणा सरकारने करमुक्त केला आहे. त्यानंतर हा चित्रपट महाराष्ट्रामध्येही चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. अखेर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related