कार्टोसॅट-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Date:

चेन्नई: पृथ्वीचे भूपृष्ठीय निरीक्षण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे टिपणाऱ्या कार्टोसॅट-३ या उपग्रहासह अमेरिकेच्या १३ अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे आज सकाळी ९.२८ वाजता यशस्वी प्रक्षेपण झाले. या प्रक्षेपणावेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन श्रीहरिकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत या मिशनचे इंजिनीअर्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. चांद्रयान २ नंतरचं इस्रोचं हे पहिलंच लाँच आहे.

कार्टोसॅट – ३ ला भारताचा डोळा म्हटलं जात आहे. कारण या उपग्रहाद्वारे मोठ्या स्तरावर मॅपिंग केलं जात आहे. शहरांचं मॅपिंग या उपग्रहाद्वारे केली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलभूत सोयीसुविधांचं व्यवस्थापन करणं या मॅपिंगमुळे सुकर होणार आहे. हा कार्टोसॅट श्रृंखलेतील नववा उपग्रह आहे.

श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडमधून याचे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसलव्ही-सी४७ मोहिमेच्या ‘काऊंटडाऊन’ला मंगळवारी सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथे सुरुवात झाली. पीएसएलव्ही-सी४७ हा उपग्रहवाहक आपल्या ४९व्या मोहिमेअंतर्गत १३ नॅनो उपग्रहांसह कार्टोसॅट-३ अवकाशात सोडणार आहे.

कार्टोसॅट-३ ची वैशिष्ट्ये

कार्टोसॅट-३ हा तिसऱ्या पिढीतील अत्यंत कुशल, अत्याधुनिक उपग्रह असून उच्च प्रतीची छायाचित्रे काढण्याची क्षमता यात आहे. कार्टोसॅट-३चे वजन १ हजार ६२५ किलो असून ते शहरी नियोजन, ग्रामीण साधने आणि पायाभूत विकास, किनाऱ्यावरील जमिनीचा वापर याबाबत वाढत्या मागण्या पूर्ण करणार आहे. अवकाश विभागाच्या न्यू स्पेस इंडिया लि.सोबतच्या व्यावसायिक कराराचा भाग म्हणून अमेरिकेचे १३ व्यावसायिक तत्त्वावरील नॅनो उपग्रहही प्रक्षेपित केले जाणार आहेत. यामध्ये फ्लॉक-४पी श्रेणीतील १२ आणि मेशबेड या एका नॅनो उपग्रहाचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरील ही ७४वी मोहीम असेल, असे इस्रोने म्हटले आहे.

कार्टोसॅट-३ उपग्रहाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. २२ जुलै रोजी झालेल्या चांद्रयान मोहिमेनंतर इस्रो कार्टोसॅट-३ आणि अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण करत आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Why IT companies in Pune Hinjewadi Continues to Attract IT Companies?

Hinjewadi is the western district of Pune which has...

New IT Companies in Pune Hinjewadi: Pune’s Growing Tech Hub

Hinjewadi is the western district of Pune which has...

Happy Children’s Day 2024: Celebrate the Future, Honor the Present

  Happy Children's Day 2024: Celebrate the Future, Honor the...

India’s largest Multinational IT companies growing in 2025

There are List of Top 10 MNC's in India...