चांद्रयान-२ ने पाठवला चंद्रावरील खड्ड्याचा 3D फोटो

Date:

चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने चंद्रावरील खड्ड्याचा ३ डी फोटो पाठवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने बुधवारी हा फोटो ट्विट केला आहे. चांद्रयान-२ च्या टेरेन मॅपिंग कॅमेरा- २ द्वारे चंद्रावरील खड्ड्याचा हा ३ डी फोटो काढण्यात आला आहे. चांद्रयानचे आर्बिटर चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे.

खड्ड्याचा फोटो ट्विट करत इस्रोने असे सांगितले की, ‘ चांद्रयान २ च्या टीएमसी -२ मधून घेतलेल्या खड्ड्याचा ३ डी फोटो पहा. टीएमसी -२ वरून चंद्राच्या पृष्ठभागासह डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्स तयार करण्यासाठी ५ एम स्पेटियल रिझॉल्यूशन आणि स्टिरियो ट्रिपलेटमध्ये फोटो घेतले जाऊ शकतात.’

चंद्रावरील खड्ड्याचे ३ डी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रोच्या कामाचे कौतुक केले जात आहे. चांद्रयान-२ने मोहिमे दरम्यान तिसऱ्यांदा फोटो पाठवला आहे. या आधी चांद्रयान २ ने अंतराळातून पृथ्वीवरील फोटो आणि चंद्रावरचा फोटो पाठवला होता.

दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष (सीएसओ) के सिवन यांनी सांगितले की, ‘चांद्रयान -२ मोहिमेने आतापर्यंत ९८ टक्के उदिष्ट्य पूर्ण केले आहे. ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. ऑर्बिटर साडेसात वर्ष कार्यरत राहिल. तसंच विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी वैज्ञानिक खूप मेहनत करत आहेत.’

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...