नागपूर : कमाल चौकातील फिरंगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने बुधवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणाहून पोलिसांनी दहा अल्पवयीन युवकांसह ३० जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हुक्क्याचे साहित्य, तंबाखूचे १० बॉक्स व अन्य साहित्य जप्त केले.
कुख्यात गुंड सुमित मोरयानी याच्या मालकीचे कमाल चौकात फिरंगी हॉटेल अँड रेस्टॉरेंट आहे. या हॉटेलमध्ये जेवणासह हुक्का पार्लरची सोय होती. याच कारणामुळे गेल्या काही महिन्यांपासून फिरंगी हॉटेलमध्ये युवक आणि युवतींची वर्दळ राहायची त्यामुळे क्राइमचे डीसीपी नीलेश भरणे यांना संशय आला. त्यांनी दोन पंटर पाठवून शहानिशा केली. त्यानंतर बुधवारी रात्रीला अचानक छापा घातला. या छाप्यात हुक्क्याच्या नशेत झिंगत असलेले १० अल्पवयीन विद्यार्थी आणि २० युवक आढळून आले. वैद्यकीय तपासणीसाठी सर्वांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
अधिक वाचा : दूध टैंकर की टक्कर से युवती की मौत, 2 जख्मी