नागपुरात एकाच कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या

Date:

नागपूर : उपराजधानीत पाँलिटेक्निकच्या तरुण तरुणीने एकाच दिवशी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोघेही एकाच काँलेजचे विद्यार्थी होते. नंदनवन व हुडकेश्वरमध्ये घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे

श्वेता शिवशंकर यादव वय १७ वर्ष रा. अयोध्यानगर व अभिषेक विजय सोनकुसरे वय २० वर्ष रा.एल आय जी काँलनी नंदनवन अशी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही प्रियदर्शनी पाँलिटेक्निक काँलेजचे विद्यार्थी होते. श्वेताने १० मार्च रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घरी कुणी नसताना गळफास लावला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस तपास करीत आहे.

नंदनवमधील एलआयजी कॉलनी भागात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अभिषेक याने दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो प्रियदर्शिनी पॉलिटेक्निकमध्ये तृतीय वर्षाला शिकत होता. याप्रकरणी नंदनवन पोलीस तपास करीत असून, दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अधिक वाचा : स्टार बस वाहकांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांना अटक 

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related