नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे अजनी येथील मल्टी मोडल स्टेशनच्या पहिल्या चरणाचे भूमीपूजन स्थानिक अजनी रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी उपस्थित होतेते.
प्रमुख अतिथिच्या स्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्यासह मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत प्रामुख्याने उपास्थित होते.
ई. पी. सी. मोडव्दारे भारतमाला परियोजने अंतर्गत अजनी येथे निर्माण होणारे ‘इंटर मोडल स्टेशन’ (आए. एम. एस) मुळे रेल्वे, बस व मेट्रो या तीनही वाहतूक यंत्रणा एकत्र येणार आहेत. सुमारे 1288 कोटी रुपयाचा हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
या कार्यक्रमास दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपास्थित होते.
अधिक वाचा : मुख्यमंत्री व ना. गडकरी यांच्या हस्ते संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे भूमिपूजन