नागपूर : लवकरच नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेला सुरवात होणार असल्याने सौंदर्यीकरणाचे कार्य देखील वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मिंग नागपूर आता खऱ्या अर्थाने दृष्टीपथास यायला लागले आहे. रिच-१ कॉरिडोर अंतर्गत वर्धा मार्गवरील खापरी ते सीताबर्डीपर्यन्त मेट्रोमार्गाशी संबंधित पिलर, व्हायाडक्त, ट्रॅक, ई. सर्व महत्वाचे कार्य पूर्ण झाले असून आता यामार्गावर रस्त्याचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण करण्यास सुरवात झाली आहे.
नागपूर मेट्रोच्या रिच-१ चे बांधकाम ज्या ज्या परिसरात पूर्ण होत आहे त्याभागातील बॅरिकेट काढून जागा नीटनेटकी करून रस्त्यांचे रुंदीकरण, बांधकाम, फूटपाथ तयार करणे, परिसरातील सौन्दर्य वाढविण्यासाठी परिसरात झाडे लावणे, रंगरंगोटीचे कार्य आता युद्धस्तरावर केले जात आहे.
व्हायाडक्तवर दोन्ही बाजूने स्टील रेलिंग लावण्यात आली आहे. मुख्यम्हणजे या रेलिंगवर माझी मेट्रो नाव लिहण्यात आले आहे. स्टील रेलिंगमुळे व्हायाडक्त मेट्रोमार्ग दिसायलाही आकर्षक दिसत आहे. नागपूरकरांना माझी मेट्रोविषयी नेहमी अभिमान वाटावा त्यादिशेने महा मेट्रो स्तरावर कार्य करीत आहेत. कार्य दरम्यान नागरिकांतर्फे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल महा मेट्रो नेहमीच कृतद्न्य आहे.
अधिक वाचा : तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सौंदर्यीकरणाचे लोकार्पण