नागपूर : खापरी ते काँग्रेस नगर मेट्रो ची ट्रायल झाल्यानंतर आता नागपूरच्या रिच-३ अंतर्गत हिंगणा मार्गावर मेट्रोची ट्रायल घेण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रो कोचेस हिंगणा डेपोत पोहचले आहेत.
हिंगणा मार्गावर स्थित डेपो मध्ये मेट्रो ट्रेनला पाहण्यासाठी शुक्रवार पहाटे पासूनच नागरिकांची रस्त्यावर भारी गर्दी बघायला मिळाली. रुळांवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हेवी ट्रॅकवर पाहताच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. प्रकल्पाचे वेगाने होणारे निर्माण कार्य, येथील क्षेत्राचे बदलते स्वरूप व विस्तार यामुळे जवळपासच्या रहिवासी, विद्यार्थी आणि औद्योगीक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निर्माण कार्यादरम्यान अनेक समस्यांना समोर जात परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले आहे. मेट्रो ट्रेनचे रैक याठिकाणी पोहोचताच नागरिकांमध्ये वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
महामेट्रो खापरी ते सीताबर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर अशा एकूण १९ किलोमीटर च्या मार्गावर लवकरात लवकर काम पूर्ण करून मेट्रोची व्यावसायिक प्रवासी वाहतूक सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रवासी सेवेचे उदघाटन होताच नागरिकांना या मार्गावर मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. विविध ग्रामीण भागाशी संलग्नित असलेल्या या परिसरातील नागरिकांसाठी मेट्रो नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
अधिक वाचा : नागपूर महानगरपालिकेच्या सी.एन.जी. बस सेवेचा गडकरींच्या हस्ते शुभारंभ