नागपूर – शहरातील ‘रामन विज्ञान केंद्र’ शास्त्रज्ञाचे नाव असलेले भारतातील एकमेव केंद्र आहे. येथे लहान मुलांसाठी विज्ञानासंबंधी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. डॉ. सी.व्ही रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये रामण परिणामांचा शोध लावला. तेव्हापासून भारतात २८ फेब्रवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात येतो.
गेल्या काही वर्षांपासून भारताने विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये फार मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडले आणि एक विश्वविक्रम तयार केला. २१ वे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे.
डॉ. सी. व्ही रामन यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल १९५४ मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ते १९३० साली नोबेल पुरस्कार विजेते होते.
अधिक वाचा : Special voters’ registration drive on March 2, 3