नागपूर : एमडी (मेफेड्रान) या मादक द्रव्याचा व्यापार करणाऱ्या दोन आरोपींंना पकडून, 47 हजार रुपये किमतीचे एमडी पावडर आणि 4 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पांचपावली पोलिसांनी केली आहे.
मोहित राजकुमार शाहु (24) आमीर मलिक मुकीम मलीन (28) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
दयानंद पार्क जवळ कुणीतरी मादक पदार्थ घेऊन येत आहे, अशी गुप्त माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. पहाटे ३.३० च्या सुमारास आरोपी मोहित साहू अॅक्टिव्हाने दयानंद पार्कजवळून जाताना दिसला. यावरून त्यांनी सुमारास सापळा रचून वरील आरोपींंना पकडले. झडतीत मोहित याचे ताब्यातून 47 हजार रुपये किमतीची एमडी पावडर, रोख 35 हजार रुपये, दोन आय फोन, आमीर मलिक याचे ताब्यातून 9 हजार रुपये रोख, मोबाईल, युपी पासिंगची मोटरसायकल असा एकूण 4 लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाचपावली येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : बदनामीच्या भीतीपोटी अल्पवयीन मुलीची आत्महत्या