नागपूर – नागपुरात गुन्हेगारीला अक्षरश: ऊत आला आहे. गुन्हेगारांनी वेगवेगळ्या युक्त्या शोधून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. आता तर एका भामट्याने चक्क नकली क्राईम ब्रॅन्च म्हणजेच ‘गुन्हे अन्वेषण शाखा’ सुरु केली होती, ती ही भाड्याच्या घरात. एवढेच नाही तर डायरेक्टर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा त्याने बोर्डही लावला होता. तो शहरात खुलेआम फिरत होता.
पोलिसांनी नागपूरच्या समर्थनगर भागात एका भाड्याच्या घरात छापा टाकून नकली क्राईम ब्रॅन्चचा भंडाफोड केला. आरोपी नरेश पालरपवार हा ‘क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ नावाने ही नकली क्राईम ब्रॅन्च चालवत होता. पोलिसांनी आरोपी पालरपवार याला अटक केली आहे. तसेच त्याच्या कार्यालयातून काही दस्ताऐवजही जप्त केले आहेत.
अशिक्षित नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता..
आरोपीने नकली क्राईम इनव्हेस्टिगेशन एजन्सीच्या माध्यमातून शहरातील अशिक्षित नागरिकांची आर्थिक फसवणूककेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
अधिक वाचा : नागपुरात तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात विक्री, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल