नागपूर : विविध ठिकाणी झालेल्या अपघातात महिलेसह दोन जण ठार झालेत.
पहिली घटना डोंगरगाव भागात घडली. लेखराम महाकाळकर व त्यांच्या पत्नी मंदा या रस्ता पार करीत होते. एमएच-३१-ईए-२८८९ या क्रमांकाच्या कारने मंदा यांना धडक दिली. मंदा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक कारसह पसार झाला.
दुसरी घटना, नवीन कामठीतील जयस्तंभ चौकात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. भरधाव एमएच-३६-बीपी-६१४१ या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने कन्हय्या जयनारायण सिंग वय २० रा. कांद्री कन्हान हा युवक ठार झाला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर ६७.५० लाखांच्या रोकडसह एक ताब्यात