नागपुर : रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या ऑटोंवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन वाहतूक शिपायांवर पोलिसांवर ऑटोचालकांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानकाजवळील हॉटेल राहुल डिलक्स समोर घडली. या घटनेने परिसरात काही काही प्रचंड तणाव निर्माण झाला. गणेशपेठ परिसरात ऑटोचालक व खासगी प्रवासी वाहतूक करणारे दादागिरी करीत असून पोलीस आयुक्तांनी तांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनू कांबळे रा. बेलतरोडी व मयूर राजूरकर रा. रामबाग या ऑटोचालकांना अटक केली. हवालदार किशोर धपके व शिपाई प्रकाश सोनोने,अशी जखमी वाहतूक पोलिसांची नावे आहेत. दोघेही वाहतूक शाखेच्या कॉटन मार्केट झोनमध्ये कार्यरत आहेत. किशोर धपके व प्रकाश सोनोने हे जामर कारवाई पथकात आहेत. दुपारी ते बसस्टॅण्ड भागात कारवाई करीत होते. पोलिसांनी एमएच-४९, ई-४७०७ व एमएच-४९, ई- ०५३० या क्रमांकाच्या ऑटोला जामर लावले. त्यामुळे सोनू व मयूर संतापले. दोघांनी वाहतूक पोलिसांसोबत वाद घातला. वाद विकोपाला केला. दोघांनी वाहतूक पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ऑटोचालकांना अटक केली.
अधिक वाचा : हेल्मेट न घातल्याने जाब विचारणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला