नागपूर : पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या नेतृत्वात इमामवाडा पोलिसांनी कुख्यात लंकेश याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले. निशांत दिनेश शंभरकर, प्रदीप रामचंद्र उमरे, राजा धनराज मांजरे, सतीश गुरुदेव गाणार, पृथ्वीराज एकनाथ तागडे व राजेश राजू गुप्ता,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कुख्यात लंकेश मेश्राम हा फरार आहे.
लंकेश हा टीबी वॉर्ड परिसरात जुगार अड्डा चालवित असून, सट्ट्याची खायवडी करीत असल्याची माहिती उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. भरणे यांच्या नेतृत्वात इमामवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एम. साळुंके, उपनिरीक्षक व्ही. व्ही. नरवाडे, हेडकॉन्स्टेबल परमेश्वर, रामेश्वर, विजय शिपाई मिलिंद, रमण खैरे, गोविंद चाटे, नितीन यांनी सापळा रचून लंकेश याच्या अड्ड्यावर छापा टाकला. लंकेश हा पसार झाला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली.
अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी, आरोपीस अटक