नागपूर : नागपूरच्या प्रसिद्ध गोरेवाडा प्राणी संग्रहालयात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. हा बिबट्या अचानक काळविटांच्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याने 5 चितळ, 3 काळविट आणि एका चौशिंग्याचा फडशा पाडला. या घटनेनंतर गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार काळविटांच्या पिंजऱ्याला सोलार फेन्सिंग आहे. मात्र हे सोलार फेन्सिंग बंद झाल्याने बिबट्याला आत शिरता आले आणि त्याने संधीचा फायदा घेत तिथल्या प्राण्यांवर हल्ला चढवला. आता या प्रकरणानंतर वनविभाग पुन्हा एकदा अडचणीत येणार आहे.
अधिक वाचा : कामठी येथून ४६ किलो गांजा जप्त, तिघांना अटक