दहा वर्षांच्या मुलाला ट्रकने चिरडले; दोघे जखमी

Date:

नागपूर : एका वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले. यामध्ये दहा वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना पारडी बाजार परिसरातील नागनदीच्या पुलावर घडली. नैतिक करताल सनोडीया (रा. भांडेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

राकेश सनोडीया व दुग्गू सनोडीया (4 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. नैतिकच्या मित्राचा मंगळवारी वाढदिवस होता. त्याच्या घरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राकेश हे भावाचे मुलांना घेऊन पारडी येथे गेले होते. रात्री 10.30 वाजता ते मुलांना घेऊन (एमएच-49, एझेड-2183) क्रमांकाच्या दुचाकीने परत येत असताना शुभानगनर ते पारडी बाजारला जोडणाऱ्या नागनदीच्या पुलावरून जात हाते.

दरम्यान, समोरून येणाऱ्या (एपी-25, यु-6035) क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात तिघेजण जखमी झाले. स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान नैतिकचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला.

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एस. पवार यांनी गुन्हा दाखल केला. अचानक झालेल्या अपघातात दोन्ही मुले गंभीर जखमी झाले. सैरभैर झालेल्या काकाने स्वतःला लागलेल्या जखमांकडे दुर्लक्ष करीत दोन्ही मुलांना कवेत घेतले. मोठ्याने हंबरडा फोडून मदतीसाठी धावा ठोकल्या. दरम्यान, मोठा मुलगा नैतिकचा काकाच्या मांडीवरच मृत्यू झाला. काकाने मोठ्याने टाहो फोडला.

अधिक वाचा : नागपुरात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...