नागपूर : केयर कंपनीच्या अहवालावरून बँक ऑफ महाराष्ट्रने महापालिकेला ‘ए-निगेटिव्ह’ मार्किंग दिले आहे. त्यामुळे महापालिका आर्थिक संकटात नाही, हे स्पष्ट होते. यामध्ये सुरुवातीला महापालिकेचे रेटिंग ‘बी’ दिसून येत होते. मात्र कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ‘बी ++’ ही श्रेणी मिळण्याची शक्यता वाढली. जेव्हा पूर्ण कागदपत्रांची तपासणी केली, तेव्हा महापालिकेला ‘ए-निगेटिव्ह’ रेटिंग देण्यात आले.
महापालिकेला २०० कोटींचे कर्ज हवे होते. त्यासाठी महापालिकेने बँक ऑफ महाराष्ट्रकडे कर्जाची मागणी केली. मात्र बँकेने कर्ज देण्याआधी महापालिकेला त्यांचे रेटिंग मागितले. परिणामी महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब नाही, हे निश्चित करण्यासाठी केयर कंपनीकडून महापालिकाने रेटिंग निश्चित करण्यात आले.
ए-निगेटिव्ह रेटिंग मिळाल्याने आता कर्ज घेण्यासाठी एकाचवेळी रक्कम डिपॉझिट करून ठेवण्याची गरज पडणार नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.
अधिक वाचा : नागपूर महापालिकेद्वारे सक्करदरा तलाव येथे स्वच्छता अभियान