नागपूर : न्यायालय परिसरातच आरोपीने वकिलावर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:विष पिऊन आत्महत्या केली आहे. या घटनेत दोघेही गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदानंद नारनवरे असे हल्लामध्ये गंभीर जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे. तर लोकश भास्कर असे मृत हल्लेखोराचे नाव आहे.
नारनवरे हे विधी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. तर त्याच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा देखील वकील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांला अटक करून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान आरोपीचा मृत्यू झाला आहे. जीवघेणा हल्ल्याची ही थरारक घटना आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये वकील नारनवरे गंभीर जखमी आहेत.
अधिक वाचा : क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार; गंभीर जखमी