महामेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतला मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा

Date:

नागपूर : महामेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याची पाहणी केली. हिंगणा डेपो, मेट्रो स्थानक, उन्नती मार्ग आणि रुळांचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. डॉ. दीक्षित यांनी सोमवार, १७ डिसेंबर रोजी रिच-३ कॉरिडोर (लोकमान्य नगर ते सीताबर्डी) मध्ये आतापर्यंत झालेल्या कार्याचे निरीक्षण केले.

हिंगणा डेपो मध्ये सुरु असलेल्या कार्याचा आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर मेट्रो दरम्यान निर्माणाधीन मेट्रो स्टेशन, मेट्रो ट्रॅक व इतर संबंधित कार्याचा त्यांनी आढावा घेतला. तसेच स्टेशनवरील प्लॅटफॉर्म, ओएचई, लिफ्ट, एस्केलेटर आणि विद्युतीकरण संबंधित कार्यांची देखील पाहणी केली.

सर्वप्रथम हिंगणा डेपो येथे सुरु असलेल्या कार्याचे डॉ. दीक्षित यांनी बारकाईने निरीक्षण करून कोचेसचे मेंटेनन्स करणारे इंजिनिअर ट्रेन युनिट (ईटीयू), कोचेस धुण्याचे स्वयंचलित तांत्रिक कक्ष, सिस्टम्ससाठी उपयुक्त संयुक्त सेवा व इतर संबंधित कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

अधिक वाचा : मेट्रो कोचेसची पैकिंग पूर्ण, भारतात रवानगी करता सज्ज

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Why IT companies in Pune Hinjewadi Continues to Attract IT Companies?

Hinjewadi is the western district of Pune which has...

New IT Companies in Pune Hinjewadi: Pune’s Growing Tech Hub

Hinjewadi is the western district of Pune which has...

Happy Children’s Day 2024: Celebrate the Future, Honor the Present

  Happy Children's Day 2024: Celebrate the Future, Honor the...

SMHRC Opens Doors to Specialized Outborn Neonatal Care for Newborns in Need

SMHRC Launches Dedicated Outborn NICU Offering 24/7 Specialized Care...