नागपूर : महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या पथकाला नागरिकांनी विरोध दर्शविला. यावेळी काही असामाजिक तत्त्वांनी अतिक्रमण पथकावर दगडफेकही केली.
यावेळी अग्रसेन चौक परिसरात जमावाला पंगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. लोकांच्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात मनपा पथकाने धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. धार्मिक स्थळ हटविण्यात नागरिक विरोध करण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे आधीच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मंदिरांवर कारवाई करत असल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘पिटिशन फॉर लिव्ह टू अपील‘ या ऍक्टनुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे.
अधिक वाचा : नागपूर मध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई पुन्हा सुरू