चंद्रपूर : ताडोबा च्या कोअर व बफरच्या सीमेवर असलेल्या अर्जुनी गावालगत शेतात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामुळे खळबळ उडाली आहे. मागील दोन महिन्यात ताडोबात पाच व्यक्तींचा जीव गेला असून सततच्या हल्ल्याने गावकरी संतापले आहेत.
दरम्यान, बिबट्याने या भागात घातलेला धुमाकूळ बघता त्याची दखल घेत ट्रँक्विलाईज करून तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. वनविभागाचे शुटर्स देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. व
रोरा तालुक्यातील अर्जुनी या गावालगत धोंडुजी हजारे यांच्या शेतामध्ये निर्मला बबन श्रीरामे (वय ४५) ही महिला कापूस वेचत होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केले. मागील दोन महिन्यात वन्यजीव हल्ल्यात तीन व्यक्तीच्या जीव गेला असून जखमीही झाल्याचे प्रकार घडले आहे. सततच्या हल्ल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांच्या रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागला. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मृतकाच्या नातेवाईकांना अडीच लाख रुपयांचा धनादेश व ५० हजारांची रोख रक्कम अशी तातडीची मदत दिलेली असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
पाच जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद
मागील दोन महिन्यात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेली ही पाचवी घटना ठरली. बिबट्याने या भागात घातलेला धुमाकुळ बघता ताडोबा व्यवस्थापनाने त्याला जेरबंद करण्यासाठी परवानगी मागितली. अखेर त्याची दखल घेत बिबट्याला ट्रँक्विलाईज करून तातडीने जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून आले. परिसरात दोन पिंजरेही लावण्यात आले. शुक्रवारी या परिसरात लावलेल्या एका पिंजऱ्यात हा बिबट्या अलगद अडकला. वनविभागाने या बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याला कुठे सोडायचे याबाबत विचार सुरू आहे.
अधिक वाचा : ताडोबा वन क्षेत्रात विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू