नागपूर : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला मिळालेला विजय हा काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया ख्रिश्चन कोआॅर्डीनेशन कमिटीचे प्रा. विजय बारसे यांनी व्यक्त केली. राहुल गांधी हे देशातील उगवते नेतृत्व आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांना पप्पू म्हणून हीणवणाऱ्यांना हा विजय म्हणजे चांगलीच चपराक असल्याचे बारसे यांनी स्पष्ट केले.
देशात अल्पसंख्यांकाविरूद्ध पसरविण्यात येत असलेल्या द्वेषमूलक वातावरणाला मिळालेले हे सडेतोड उत्तर आहे. यामुळे भाजपाची फेकूगिरी आणि खोटे बोलण्याच्या सवयीला लगाम बसेल, असे बारसे म्हणाले. २०१९ मधील निवडणुकांवर या निकालांचा निश्चित परिणाम होईल. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी लाट आणि नवी उर्जा आली आहे. काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार असून या विचाराला जनतेने स्वीकारल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे. मंदिर-मशिदीच्या नाऱ्यांना जनता यापुढे भूलणार नसून जनतेला आता विकास हवा आहे. विकास पुरूषाचा बुरखा आता फाटला असून देशातील युवक आता राहुल गांधींच्या मागे उभा राहिल, असे बारसे म्हणाले. चर्चेसला जाळून तेथे मंदिरे बांधण्यात आली. ख्रिश्चनांवर हल्ले करण्यात आले. पण यापुढे जातीयवाद चालणार नाही, असे बारसे म्हणाले. या वेळी नितु मंवतकर, मोहन अरपाल, अनिल नागवाणी, प्रशांत माशितीवर, सोनू चौरासिया . मिलिंद गजभिये, अब्दुल कादिर अन्सारी, पीटर बेजामीन मिथुन उईके, खुशबू परवार. डायना लिंगेकर, हेलन, सुरेश बहुलकर, किरण मोहिते, अमित शेंडे, जॉन थोमास, बाबा इंदूरकर, जॉर्ज फ्रांसिस, आशुतोष बॅनडिंक, विजय बारसे इत्यादी उपस्तित होते
अधिक वाचा : सिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त