नागपूर : तिकीट विक्री घोटाळ्यानंतर आता ‘आपली बस‘ च्या चालक आणि वाहकांनी मिळून तिकीटाची अफरातफर केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या समितीने तपासणी केल्याने हा घोटाळा उघडकीस आला. आपली बसच्या चालक आणि वाहकांनी व्हाट्सअॅपचा ग्रुप तयार करुन तपासणी अधिकारी यांच्या ग्रुपवर लोकेशन शेअर केले होते. त्यानुसार प्रवाशांना तिकीट दिले जायचे.
तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्ड घोटाळा मार्चमध्ये उघडकीस आला. त्यानंतर एप्रिल २०१८ पासून आपली बसमध्ये वाहन चालकांना मोबाईल वापरण्यावर बंदी होती. मात्र, त्यानंतरही मोबाईलचा उपयोग चालक व वाहक सर्रास करत होते. तेव्हा कारवाई करत चालक आणि वाहकांकडून १२ मोबाईल जप्त करण्यात आले. तेव्हा त्या मोबाईलच्या व्हाट्सप ग्रुपची तपासणी करण्यात आली. तेव्हा परिवहन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या लोकेशनची शेअर केले असल्याचे दिसले. परिवहन समितीने संबंधित प्रकरणाची पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
महानगर पालिकेचा परिवहन विभाग तोट्यात आहे. परिणामी उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी प्रयत्न करत आहेत, असे असताना बसमधील प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देण्याचे प्रकरण उजेडात आले आहेत. वाहकांना निलंबित केल्यानंतरही स्थिती सुधारली नाही. तोट्यातील मनपा परिवहन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.
अधिक वाचा : रेल्वेमधून दारू तस्करी करणाऱ्या आरोपीला नागपुरात अटक